पीएम किसान योजनेचे लाभ प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आवश्यकता आहे आणि पात्र शेतकरी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतींद्वारे त्यांचे ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू आणि 1 डिसेंबर 2018 पासून अंमलात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम–किसान) ही भारत सरकारद्वारे सुरू केलेली आर्थिक सहाय्य योजना आहे. याचा उद्देश शेती आणि संबंधित कामांसाठी आणि लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरगुती गरजांसाठी आर्थिक मदत प्रदान करणे आहे, जेणेकरून पीकांचे आरोग्य आणि योग्य उत्पादन सुनिश्चित करता येईल.
पीएम-किसान योजनेसाठी जमीन धारण हे मूलभूत पात्रता निकष आहे जे संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदींवर आधारित स्थापित केले जाईल. तथापि, उच्च-उत्पन्न स्तर आणि कर-दात्यांना वगळण्यात आले आहे. जमीन मालकी निश्चित करण्यासाठी अंतिम तारीख 1 फेब्रुवारी, 2019 होती आणि त्यानंतर पुढील 5 वर्षांसाठी कोणताही बदल विचारात घेण्यात आला नाही.
लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष ₹6,000 दिले जातात, त्यांच्या आधार-लिंक्ड बँक अकाउंटमध्ये हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे पीएम-किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य होते. पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक आहे कारण ते योजनेच्या लाभार्थींच्या ओळखीची अखंड पडताळणी करण्याची परवानगी देते.
ई–केवायसी (e-KYC) म्हणजे काय?
ई-केवायसी (e-KYC) किंवा इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर, हे आधार-आधारित पेपरलेस पडताळणी आहे जी आधार धारकांना त्यांची ओळख स्थापित करण्याची परवानगी देते.
पीएम–किसान पात्र शेतकऱ्यांसाठी ई–केवायसी (e-KYC) प्रक्रिया
पीएम किसानसाठी पात्र शेतकरी अनेक सोप्या आणि त्रासमुक्त पद्धतींद्वारे त्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करू शकतात. येथे विविध पद्धती आहेत ज्याद्वारे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रोसेस करू शकतात.
पीएम–किसान योजनेसाठी ओटीपी आधारित ई–केवायसी (e-KYC)
जर पात्र शेतकऱ्याकडे आधार-लिंक्ड मोबाईल फोन नंबर असेल तर पीएम-किसानसाठी वन-टाइम पासवर्ड (ओटीपी)(OTP) आधारित ईकेवायसी (e-KYC) शक्य आहे. खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते:
- अधिकृत पीएम-किसान पोर्टल gov.in ला भेट द्या
- होमपेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात स्क्रोल करा आणि “केवायसी(e-KYC) ” वर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक प्रविष्टकरा
- तुमचा ओटीपी(OTP) सबमिट केल्यानंतर पीएम-किसान योजनेसाठी तुमचे केवायसी (e-KYC) पूर्ण करा
पीएम–किसान योजनेसाठी बायोमेट्रिक ई–केवायसी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केवायसी (e-KYC) प्रोसेस करण्यासाठी ही ऑफलाईन सुविधा आहे. पात्र शेतकरी जवळच्या सामान्य सेवा केंद्र (सीएससी) (CSC) किंवा राज्य सेवा केंद्र (एसएसके)(SSK) वर जाऊ शकतात आणि त्यांच्या केवायसी (e-KYC) वर प्रक्रिया करू शकतात. सीएससी (CSC) https://locator.csccloud.in येथे उपलब्ध आहे आणि येथे खालील पायऱ्यांचे पालन करावे लागेल:
- तुमच्या आधार कार्ड आणि आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरसह नजीकच्यासीएससी(CSC) किंवा एसएसके (SSK) ला भेट द्या
- तेथीलऑपरेटर आधार-आधारित पडताळणी वापरून बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करण्यात पात्र शेतकऱ्याला मदत करेल
पीएम किसान योजनेसाठी फेस–ऑथेंटिकेशन केवायसी (e-KYC)
पात्र शेतकरी पीएम-किसान मोबाईल ॲप वापरून त्यांच्या स्वत:च्या मोबाईल फोनसह पीएम-किसान योजनेसाठी त्याच्या किंवा तिच्या ई-केवायसी (e-KYC) वर प्रक्रिया करू शकतात. त्याला किंवा तिला खालील पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल:
- गूगल प्ले स्टोअरवर जा आणि पीएम-किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करा
- पीएम-किसान ॲप उघडा आणि तुमच्या पीएम-किसान रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे लॉग-इन करा
- लाभार्थी स्थिती पेजवर जा
- “ई-केवायसी(e-KYC)” वर क्लिक करा आणि नंतर तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा
- फेस स्कॅनसाठी सहमती द्या
- एकदाका तुमचे फेस स्कॅन यशस्वीरित्या पूर्ण झाले की, तुमचे PM किसान योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झाले आहे
पीएम किसान के–वायसी (e-KYC) साठी टाइमलाईन
पात्र शेतकऱ्याने कोणत्याही पद्धतीद्वारे त्याचे किंवा तिचे पीएम किसान ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केल्यानंतर, ई-केवायसी (e-KYC) ची स्थिती 24 तासांनंतर दिसून येईल. शेतकरी पीएम-किसान पोर्टल आणि किसान-मित्र (पीएम-किसान एआय चॅटबॉट) वरील नो युवर स्टेटस (केवायसी) मॉड्यूलमधून त्यांची स्थिती ॲक्सेस करू शकतात
निष्कर्ष
पात्र शेतकऱ्यांना त्यांचे पीएम-किसान ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे कारण योजनेचे लाभ प्राप्त करण्यासाठी ही अनिवार्य आवश्यकता आहे. ई-केवायसी (e-KYC) शिवाय, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळू शकत नाही कारण रक्कम थेट शेतकऱ्याच्या आधार-लिंक्ड बँक अकाउंटमध्ये हस्तांतरित केली जाते.