पीएम किसान योजनेमध्ये फोन नंबर, ॲड्रेस, बँक अकाउंट कसे अद्यावत करावे?

1 min read
by Angel One

तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचा फोन नंबर, ॲड्रेस किंवा बँक अकाउंट बदलायचा असू शकतो, परंतु तुम्ही त्वरित तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी रेकॉर्डमध्ये ती माहिती अद्यावत करावी.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली आणि 1 डिसेंबर, 2018 पासून अंमलात आणली गेली. कृषी आणि संबंधित उपक्रमांमध्ये तसेच घरगुती गरजांमध्ये मदत करण्यासाठी जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करून योग्य पीक आरोग्य आणि योग्य उत्पन्न सुनिश्चित करणे हे याचे उद्दीष्ट आहे.

या योजनेसाठी जमीन मालकी हा मूलभूत पात्रता निकष आहे, तर उच्च उत्पन्न गट आणि करदात्यांसह अनेक श्रेणी वगळण्यात आल्या आहेत. पीएम किसान योजना च्या उद्देशाने जमिनीची मालकी संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या रेकॉर्डवर आधारित स्थापित केली जाते.

पीएम किसान योजना ही 100% भारत सरकारद्वारे वित्तपुरवठा केली जाते. योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये थेट जमा केलेल्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष ₹6000 दिले जातात. योजनेचे लाभ प्राप्त करण्यासाठी आणि अद्यावत केलेले राहण्यासाठी लाभार्थ्यांना सर्व अचूक तपशील आणि संबंधित माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणीसाठी शेतकऱ्याने प्रदान करावयाच्या अनिवार्य तपशिलामध्ये त्याचे नाव, लिंग, श्रेणी, शेतकरी प्रकार, आधार नंबर, आयएफएससी कोड, बँकचे नाव, अकाउंट नंबर, पत्ता, जमीन तपशील आणि मोबाईल नंबर यांचा समावेश होतो. तथापि, लाभार्थींना त्यांच्या माहितीला अद्यावत करणे आवश्यक असू शकते, मग ते फोन नंबर किंवा ॲड्रेस किंवा बँक अकाउंटमध्ये बदल असो. शेतकरी महत्त्वाचे तपशील कसे अद्यावत करू शकतात हे येथे दिले आहे.

पीएम किसान योजनेमध्ये फोन नंबर कसा अद्यावत करावा?

फोन नंबर बदलण्याची गरज कोणत्याही परिस्थितीत उद्भवू शकते. या प्रकरणात, लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान नोंदींमध्ये फोन नंबर बदलावा लागेल. लाभार्थी शेतकरी पीएम किसान फोन नंबर कसा अद्यावत करतो हे येथे दिले आहे.

  • gov.in ला भेट देऊन अधिकृत पीएम किसान वेबसाईटवर जा
  • वेबसाईटच्या होमपेजवर, “फार्मर्स कॉर्नर” वर जा
  • “मोबाईल नंबर अद्यावतकरा” वर क्लिक करा
  • तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर प्रविष्ट करा, कॅप्चा कोड लिहा आणि “शोधा” दाबा
  • पुढील पायऱ्यापूर्ण करा आणि तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी (OTP) प्राप्त होईल
  • ओटीपी(OTP) प्रविष्ट करा आणि तुमचा मोबाईल फोन नंबर अद्यावत केला जाईल

पीएम किसान योजनेमध्ये पत्ता आणि बँक खाते कसे अद्यावत करावे?

ई-केवायसी (eKYC) पूर्ण करून शेतकरी पीएम किसान रेकॉर्डमध्ये त्याचा पत्ता आणि बँक अकाउंट अद्यावत करू शकतात. परंतु ते करण्यापूर्वी, त्याला संबंधित कागदपत्रे आणि अद्यावत केलेले ई-केवायसी (eKYC) तपशील आवश्यक असतील. ई-केवायसी (eKYC) प्रोसेस पूर्ण करण्यासाठी जलद पायऱ्या येथे आहेत.

  • अधिकृत पीएम-किसान पोर्टल gov.in ला भेट द्या
  • होमपेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात स्क्रोल करा आणि “ई-केवायसी(eKYC)” वर क्लिक करा
  • तुमचा आधार क्रमांक प्रविष्टकरा
  • तुमचा ओटीपी(OTP) सबमिट केल्यानंतर PM किसान योजनेसाठी तुमचे ई-केवायसी (eKYC) पूर्ण करा
  • तुमच्या ई-केवायसी(eKYC) तपशिलानुसार तुमचा ॲड्रेस आणि बँक अकाउंट अद्यावत केला जाईल

निष्कर्ष

लाभार्थी शेतकऱ्याने नेहमीच पीएम किसान रेकॉर्डमध्ये वैध माहिती प्रदान करावी आणि कोणतेही बदल त्वरित अद्यावत केले पाहिजेत. यामुळे शेतकऱ्याला योजनेशी संबंधित घटना आणि बातम्यांबद्दल अद्ययावत राहण्यास मदत होईल आणि त्याला अनावश्यक त्रास आणि कायदेशीर अडचणींपासून वाचवता येईल.