पीएम(PM) किसान सन्मान निधी योजना: 2025 मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा

1 min read
by Angel One

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सहाय्य योजना आहे. योजनेंतर्गत नोंदणीसाठी अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतींमध्ये सादर केला जाऊ शकतो.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम(PM)-किसान) ही जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी भारत सरकारद्वारे सुरू केलेली आर्थिक सहाय्य योजना आहे. योग्य पीक आरोग्य आणि योग्य उत्पन्न सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कृषी आणि संबंधित उपक्रमांसाठी आणि देशांतर्गत गरजांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे याचे उद्दीष्ट आहे.

पीएम(PM)-किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 1 डिसेंबर, 2018 पासून अंमलात आणली गेली. योजनेसाठी मूलभूत पात्रता निकष जमीन धारण आहे जे संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदींवर आधारित निश्चित केली जाईल. तथापि, उच्च-उत्पन्न स्तर आणि कर-दात्यांना वगळण्यात आले आहे. जमीन मालकी निश्चित करण्यासाठी अंतिम अंतिम तारीख 1 फेब्रुवारी, 2019 होती आणि नंतर पुढील 5 वर्षांसाठी कोणताही बदल विचारात घेण्यात आला नाही.

जर शेतकरी कुटुंबाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना साठी अर्ज करायचा असेल तर ते ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतींद्वारे केले जाऊ शकते. ॲप्लिकेशन टप्प्यादरम्यान कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याची शिफारस केली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल परंतु अद्याप लाभार्थी म्हणून नोंदणीकृत नसाल तर तुम्ही खाली नमूद पायऱ्यांचे अनुसरण करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/वर जा आणि “नवीन शेतकरी नोंदणी” वर क्लिक करा.
  • तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनवर निर्देशित केले जाईल आणि तुम्हाला सर्व अनिवार्य क्षेत्र भरावे लागतील.
  • एकदा का तुम्ही तुमचा पीएम(PM)-किसान नोंदणी अर्ज ऑनलाईन सादर केला की, तो पडताळणीसाठी राज्य नोडल अधिकाऱ्याकडे आपोआपपाठवला जाईल..

पीएम(PM) किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पीएम(PM)-किसान मोबाईल ॲप डाउनलोड करणे. एकदा तुम्ही ॲप उघडल्यानंतर, तुम्हाला “नवीन शेतकरी नोंदणी” विभागात जावे लागेल आणि त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आवश्यक तपशील भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा आणि सबमिट करा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याव्यतिरिक्त, पात्र शेतकरी पीएम(PM) किसान योजनेसाठी ऑफलाईनही अर्ज करू शकतात. योजनेचे लाभार्थी म्हणून सूचीबद्ध नसलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी यादीमध्ये त्यांच्या नावांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरीय तक्रार निवारण देखरेख समितीशी संपर्क साधू शकतात.

शेतकरी सामान्य सेवा केंद्रांशी देखील संपर्क साधू शकतात आणि त्याठिकाणी अर्ज सादर करू शकतात. केंद्र शेतकऱ्यांना पीएम(PM)-किसान पोर्टलवर नोंदणी करेल आणि शेतकऱ्याकडून नाममात्र शुल्क घेईल.

आवश्यक असलेली अनिवार्य माहिती/कागदपत्रे

जर शेतकऱ्यांचे कुटुंब पीएम(PM) किसान योजनेसाठी पात्र असेल, तर योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी अनिवार्य असलेली कागदपत्रे आणि माहिती खाली सूचीबद्ध केली आहे:

  • शेतकरयाचे/ जोडीदाराचे नाव
  • शेतकरयाचे/ जोडीदाराची जन्मतारीख
  • बँक अकाउंट नंबर
  • आयएफएससी(IFSC)/ एमआयसीआर (MICR) कोड
  • मोबाईल नंबर
  • आधार क्रमांक
  • मान्यतानोंदणीसाठी आवश्यक असलेल्या पासबुकमध्ये उपलब्ध असलेली इतर ग्राहक माहिती

त्वरित टिप्स

पीएम(PM) किसान योजनेसाठी नोंदणीमध्ये कोणतीही अडचण नसल्याची खात्री करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली पाहिजे. पीएम(PM) किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज प्रक्रियेत तुम्हाला मदत करणाऱ्या त्वरित टिप्स येथे दिल्या आहेत.

  • जेव्हा तुम्ही पीएम(PM)किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता तेव्हा सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
  • तुम्ही सबमिट केलेले सर्व तपशील अचूक आणि त्रुटीशिवाय असल्याची खात्री करा
  • तुमचे e-KYC पूर्ण असल्याची तुम्ही खात्री करणे आवश्यक आहे
  • योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पात्रता निकष समजून घेणे आवश्यक आहे

निष्कर्ष

जर पात्र शेतकऱ्याच्या कुटुंबाला पीएम(PM) किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करणे सोपे आहे- मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. सुरळीत आणि यशस्वी नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार असल्याची आणि प्रदान केलेले तपशील अचूक असल्याची खात्री करा. वेळेवर मदत देऊन तुमच्या शेतीच्या प्रवासाचे सक्षम बनवा- तुम्ही काय पात्र आहात हे चुकवू नका!