कमोडिटी ट्रेडिंग आढावा

कमोडिटी ट्रेडिंग हा, जागतिक ट्रेडिंग पद्धतीच्या मूलाधारांपैकी एक आहे , ज्यामध्ये उत्पादनासाठी आधारभूत घटक म्हणून कार्य करणाऱ्या प्राथमिक आर्थिक क्षेत्रांतील विविध वस्तूंचा व्यापार केला जातो. या वस्तू म्हणजे प्रमाणीकृत कच्चा माल असून त्या इतर वस्तूंशी अदलाबदलकरण्यायोग्य असतात.

जे गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास इच्छुक आहेत अशा गुंतवणूकदारांसाठी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट हे, परतावा वाढीसाठी व्यापक संधी प्रदान करते. परंतु कोणीही कमोडिटी मार्केटमध्ये व्यापार सुरू करण्यापूर्वी, कमोडिटी ट्रेडिंगची मूलतत्वे समजून घेणे आवश्यक आहे.

भारतातील कमोडिटी ट्रेडिंग हे, विविध एक्सचेंजमधील अत्यंत विकसित आणि नियमित कमोडिटी ट्रेडिंग मार्केटमध्ये होते.

कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय?

कमोडिटी मार्केट हे व्यापक स्वरूपाचे असून त्यामध्ये विविध प्रकारच्या कच्च्या मालाचा किंवा प्राथमिक उत्पादनांचा व्यापार केला जातो. जगभरात 100 पेक्षा जास्त कमोडिटीमध्ये व्यापार करणारी सुमारे पन्नास प्रमुख कमोडिटी मार्केट आहेत.

कमोडिटी ट्रेडिंगमुळे गुंतवणूकदारांसमोर गुंतवणूक करण्यायोग्य मत्ता म्हणून वस्तूंचा पर्याय खुला होतो. विविध एक्सचेंजमधील विनियमित मार्केटमध्ये हे घडते. सामान्य गुंतवणूकदारांसाठी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट हे,कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

सामान्यपणे, बाजारात व्यापार केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंना तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाते.

 • कृषी (चणे, सोया, बीन्स, जीरे, तांदूळ आणि रबर ही काही उदाहरणे आहेत)
 • धातू (ॲल्युमिनियम, तांबे आणि शिसे यांसारखे औद्योगिक धातू आणि सोने व चांदी यांसारखे मौल्यवान धातू)
 • ऊर्जा (नैसर्गिक वायू, कच्चे तेल आणि कोळसा)

कमोडिटी ट्रेडिंग पारंपरिक सुरक्षिततेच्या पलीकडे जाऊन पोर्टफोलिओ विविधता प्रदान करते. शिवाय कमोडिटी किंमत ही स्टॉकच्या विपरीत दिशेने जात असल्याने, गुंतवणूकदार मार्केट अस्थिरतेच्या काळात कमोडिटी ट्रेडिंगमध्ये सहभागी होतात.

कमोडिटी ट्रेडिंग कसे सुरू करावे?

कमोडिटी ट्रेडिंग नवीन तसेच अनुभवी ट्रेडर्ससाठी जोखमीचे असू शकते, कारण त्यामध्ये विशिष्ट अशी अनेक आव्हाने असतात. जर योग्य प्रकारे केले गेले तर ,कमोडिटी ट्रेडिंग लक्षणीय परतावा देते, ज्याने अनेक गुंतवणूकदारांना या मार्केटमध्ये प्रोत्साहित केले आहे. परंतु स्टॉकमध्ये ट्रेडिंग करण्यामध्ये जोखीम देखील तितकीच आहे. कमोडिटी ट्रेडिंगमध्ये किंमतीतील बदलांवर आधारित कमोडिटी खरेदी आणि विक्री केली जाते. याची सुरुवात करण्यासाठीच्या टप्प्यांबाबत पुढे मार्गदर्शन केले आहे.

बाजारपेठ समजून घेणे: गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, कमोडिटी ट्रेडिंग मार्केटच्या मूलभूत गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. भारतात सहा प्रमुख कमोडिटी ट्रेडिंग एक्सचेंज आहेत, म्हणजेच,

 • नॅशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज इंडिया (एन एम सी इ)
 • नॅशनल कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज (एन सी डी इ एक्स)
 • मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स)
 • इंडियन कमोडिटी एक्सचेंज (आय सी एक्स)
 • राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (एन एस ई)
 • बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज ( बीएसई )

कार्यक्षम ब्रोकर निवडणे: कार्यक्षम आणि विश्वसनीय ब्रोकर निवडणे ही महत्त्वाची पहिली पायरी आहे ,कारण ते तुमच्या वतीने सर्व ट्रेडिंग करणार असतात. त्यांचा अनुभव, दर, ट्रेडिंग सूट आणि सेवेचा दर्जा यांच्या आधारे ब्रोकर निवडा. जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर,पूर्ण-सेवा ब्रोकर निवडा ,जो तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी ट्रेडिंग शिफारशी करेल.

ट्रेडिंग अकाउंट उघडणे: कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी गुंतवणूकदारांना स्वतंत्र कमोडिटी ट्रेडिंग खाते उघडणे आवश्यक आहे. गुंतवणूकदाराने दिलेल्या माहितीनुसार, खाते उघडण्याच्या विनंतीचा स्वीकार करण्यापूर्वी किंवा ती नाकारण्यापूर्वी ब्रोकर जोखीम शक्यतांचे विश्लेषण करील. एकदा ब्रोकरने मंजुरी दिली कि मग , डिमॅट अकाउंट उघडले जाते.

प्रारंभिक डिपॉझिट जमा करणे: गुंतवणूक सुरु करण्यासाठी, गुंतवणूकदाराला प्रारंभिक डिपॉझिट जमा करावे लागेल, जे सामान्यपणे कराराच्या मूल्याच्या 5 ते 10 टक्के इतके असेल. देखभाल मार्जिन व्यतिरिक्त, व्यापारादरम्यान कोणतेही नुकसान भरून काढण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रारंभिक मार्जिन राखणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, सोन्यासाठी प्रारंभिक मार्जिन आवश्यकता ₹3200 आहे, जी सोन्याच्या ट्रेडिंग युनिटच्या 10 टक्के आहे.

ट्रेडिंग प्लॅन बनवा: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अंतिम टप्प्यासाठी ट्रेडिंग प्लॅन आखणे आवश्यक आहे. ट्रेडिंग प्लॅनशिवाय, दीर्घकाळ टिकून राहणे सोपे नाही. याशिवाय, एका ट्रेडरसाठीचे धोरण दुसऱ्यासाठी काम करेलच असे नाही. म्हणून, तुम्हाला तुमच्यासाठी काम करणारा प्लॅन आवश्यक असेल.

कमोडिटीचे प्रकार

ट्रेडर चार प्रमुख कमोडिटी प्रवर्गांमध्ये ट्रेडिंग करु शकतात.

धातू: बाजारात व्यापार करण्यासाठी, सोने, चांदी आणि प्लॅटिनम यांसारख्या मौल्यवान धातूंबरोबरच, लोखंड तांबे ,ॲल्युमिनियम आणि निकेल यांसारखे, बांधकाम आणि उत्पादन निर्मिती या क्षेत्रांत वापरले जाणारे विविध प्रकारचे धातू उपलब्ध आहेत.

ऊर्जा विषयक माल: घरगुती स्तरावर आणि उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऊर्जा विषयक मालाचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. हा माल म्हणजे नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल आहे. युरेनियम, इथेनॉल, कोळसा आणि वीज या इतर ऊर्जाविषयक मालांचाही व्यापार केला जातो .

कृषीविषयक माल : कमोडिटी मार्केटमध्ये विस्तृत प्रकारच्या कृषीविषयक आणि पशुधन उत्पादनांचा व्यापार केला जातो,उदाहरणार्थ, साखर, कोको, सोयाबीन, गहू, कापूस आणि अन्य.

पर्यावरणीय वस्तू: या गटामध्ये नवीकरणयोग्य ऊर्जा, कार्बन उत्सर्जन आणि श्वेत प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत.

आणखी एक प्रवर्ग आहे, ज्यामध्ये कठीण आणि मृदू वस्तू असे वर्गीकरण केले जाते. कठिण वस्तूंमध्ये नैसर्गिक संसाधने आणि खाण उत्पादने जसे की धातू हे मोडतात ,तर कृषी आणि पशुधन उत्पादने मृदू वस्तू श्रेणीत येतात.

कमोडिटी ट्रेडिंग कार्यतंत्रे

कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्हाला कार्यतंत्राची आवश्यकता आहे. परंतु लक्षात ठेवा की एखाद्या व्यापाऱ्यासाठी काम करणारे तंत्र तुमच्यासाठी काम करेलच असे नाही. त्यामुळे, तुम्हाला तुमचे ज्ञान, जोखीम क्षमता, नफा लक्ष्य आणि भारतातील कमोडिटी मार्केटच्या प्रकारांवर आधारित योजनेची आवश्यकता आहे. येथे काही प्राथमिक नियम दिलेले आहेत जे तुम्हाला कमोडिटी ट्रेडिंग कार्यतंत्रे तयार करण्यास मदत करतील.

शिकण्याची इच्छा: तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, त्याची मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, कमोडिटी ट्रेडिंगसाठी, तुम्ही कमोडिटी फ्यूचर्स आणि ऑप्शन्स आणि ते कसे ट्रेड करावेत हे समजून घेणे आवश्यक आहे. एक मार्ग म्हणजे बाजाराची हालहवाल जाणून घेण्यासाठी बाजारात खूप वेळ व्यतीत करणे होय. प्राथमिक भारतीय कमोडिटी एक्सचेंजमध्ये अनेक वस्तूंचा व्यापार केला जातो. म्हणून, तुम्हाला सुरुवात करण्यापूर्वी कमोडिटी मार्केटच्या कार्यतंत्रांबाबत स्वत:ला शिक्षित करावे लागेल.

मार्जिन आवश्यकता समजून घेणे: जेव्हा न्यायसंगतपणे वापरले जाते तेव्हा मार्जिन हे एक उत्तम साधन असते. मार्जिनमुळे तुम्हाला लक्षणीय बोली मांडण्याची मुभा मिळत असल्याने, मार्जिन आवश्यकता समजून घेणे आवश्यक आहे. बहुतांश ब्रोकर्स तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये किमान मार्जिन मर्यादा राखण्यास सांगतील आणि जेव्हा तूट असेल तेव्हा अधिक पैसे गुंतवणे आवश्यक करतील.

कमोडिटी फ्रिक्वेन्सी विषयी अंतर्दृष्टी: काही वस्तूंचा वर्षभर व्यापार केला जातो. इतर वस्तूंचा विशिष्ट महिन्यांसाठी व्यापार होतो किंवा आर्थिक चक्रांनुसार व्यापार होतो. प्रत्येक कमोडिटी काँट्रॅक्टमध्ये किमान युनिट किंमत बदलाचा आर्थिक परिणाम दर्शवणारी,भिन्न निर्देश-मूल्ये असतात.

याव्यतिरिक्त, अनेक कमोडिटी फ्यूचर्स काँट्रॅक्ट्समध्ये मूलभूत कमोडिटी प्रत्यक्षात घेण्याबाबत वेगवेगळे विनिर्देश असू शकतात, तर इतरांमध्ये केवळ वित्तीय समझोता असतो.

कमोडिटी गुणविशेष समजून घेणे: प्रत्येक मूलभूत कमोडीटीचे किंमत, प्रमाण, विस्तार, खुले हितसंबंध आणि बरेच काही विनिर्देश असतात. हे असे गुणविशेष आहेत ज्या योगे विशिष्ट कमोडिटी डेरिव्हेटिव्हच्या मागणीबद्दल व्यापाऱ्यांना स्पष्टता येते. सामान्यपणे, व्यापाऱ्यांना माहितीपूर्ण निवडी करण्यात मदत करण्यासाठी एक्सचेंज या पैलूंवर व्यापक माहिती देतात.

ट्रेडिंग मंच वापरून: आजकाल, ट्रेडिंग सॉफ्टवेअरने पारंपारिक ओपन क्राय सिस्टीम बदलली आहे. त्यामुळे किंमत- शोधनात मदत होते . ट्रेडर्स बोली लावण्यासाठी व विक्री करण्यासाठी, नफा संधी शोधण्यासाठी आणि खरेदी व विक्री शिफारशी प्राप्त करण्यासाठी विविध ॲप्लिकेशन्सचा वापर करतात.

मार्केट सहाय्य आणि प्रतिरोध: कोणत्याही रोखे बाजाराप्रमाणे, यशस्वी ट्रेडिंगसाठी कमोडिटी ट्रेडिंगमधील सहाय्य आणि प्रतिरोध स्तर समजून घेणे महत्त्वाचे आहे.

जेव्हा मागणी कमी होते, तेव्हा किंमत तळाशी येईपर्यंत कमी कमी होण्यास सुरुवात होते. हे बाजारातील खरेदीदारांना आकर्षित करते आणि किंमत पुन्हा वाढण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे, जेव्हा मागणी वाढते, तेव्हा प्रतिरोध स्तर गाठेपर्यंत किंमत वाढत जाते आणि कल पुन्हा बदलतो. बाजारात यशस्वीरित्या व्यापार करण्यासाठी कोणत्याही ट्रेडरने सहाय्य आणि प्रतिरोध स्तराबद्दल जागरुक असले पाहिजे.

सहाय्य आणि प्रतिरोध स्तर शोधण्याचे ज्ञान मिळवण्यामध्ये तांत्रिक आणि मूलभूत असे दोन्ही प्रकारचे विश्लेषण अंतर्भूत आहे.

अनुशासन महत्त्वाचे आहे: यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. गुंतवणूक योजना तयार करणे आणि बाजारात कोणतीही लाट असो , त्या योजनेला चिकटून राहणे हे महत्त्वाचे आहे. यामुळे एखाद्याला स्वतःच्या आर्थिक मर्यादा देखील जाणून घेण्याची क्षमता प्राप्त होते. संपूर्ण नुकसान झाल्यास त्यात तग धरून राहण्यासाठी ,तुमच्या मालमत्ता आणि स्तर यांच्याशी कधीही तडजोड करू नका. अनुभवी ट्रेडर्सना कोणता व्यापार ते यशस्वीरीत्या करू शकतात याची जाणीव असते.

आणि शेवटी, एकाच गोष्टीवर आपली सर्व साधनसामग्री पणाला लावण्याचे धाडस करू नका. यशस्वी गुंतवणुकीसाठी आणि दीर्घकाळ संपत्ती निर्माण करत राहण्यासाठी विविधता ही गुरुकिल्ली आहे.

कमोडिटी ट्रेडिंगचे फायदे

कमोडिटी ट्रेडिंगचे अनेक फायदे आहेत.

महागाई पासून संरक्षण: जेव्हा महागाई वाढते, तेव्हा कंपन्यांसाठी कर्ज घेणे महाग होते आणि त्यांच्या नफा कमावण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. परिणामी, उच्च महागाईच्या काळात स्टॉकच्या किंमती कमी होतात. दुसरीकडे, वस्तूंच्या किंमती वाढतात, म्हणजे प्राथमिक वस्तू आणि कच्च्या मालाची किंमत वाढते, ज्यामुळे वस्तूची किंमत जास्त होते. म्हणून, जेव्हा महागाई वाढत जाते, तेव्हा कमोडिटी ट्रेडिंग फायदेशीर होते.

राजकीय घटनांमध्ये संरक्षण: दंगल, युद्ध आणि संघर्ष यांसारख्या घटनांमुळे पुरवठा साखळीत व्यत्यय येतो, त्यामुळे प्राथमिक साहित्य महाग होते आणि व्यापक बाजारातील निराशावादी वातावरणामध्ये, स्टॉक किंमती कोसळतात. अशा परिस्थितीत, कमोडिटी गुंतवणूक ही, काही नुकसान भरून काढण्यास मदत करू शकते.

उच्चतम लाभ सुविधा: कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करून व्यापारी त्यांची नफा क्षमता वाढवू शकतात. यामुळे व्यापाऱ्यांना 5 ते 10 टक्के मार्जिन भरून बाजारात महत्त्वपूर्ण स्थिती घेता येते. अशा प्रकारे, क्षुल्लक किंमतवाढीमुळे नफ्याची संभावना प्रातिनिधिकपणे वाढू शकते. जरी किमान मार्जिन आवश्यकता एका कमोडिटीपासून दुसऱ्या कमोडिटीपर्यंत बदलत असली तरी ,ती इक्विटी गुंतवणुकीमध्ये आवश्यक असलेल्या मार्जिनपेक्षा कमी आहे.

विविधता: कमोडिटीमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची मुभा मिळते,कारण कच्च्या मालाचा स्टॉकशी नकारात्मक ते न्यून सहसंबंध असतो. वाढत्या महागाईमुळे वस्तूची किंमत वाढते, त्यामुळे नफा मार्जिन कमी होते आणि गुंतवणूकदारांना खूपच कमी प्राप्ती होते. महागाईमुळे, इक्विटी मार्केटमध्ये रोख प्रवाह देखील कमी होतो. परंतु स्टॉक किंमत आणि कमोडिटी यांच्या दरम्यान नकारात्मक सहसंबंधामुळे, कमोडिटी मार्केट हे महागाईपासून प्रभावी संरक्षण पुरविते.

पारदर्शकता: कमोडिटी मार्केट विकसित होत आहे आणि अत्यंत विनियमित असे आहे. ऐतिहासिक अशा ओपन क्राय पद्धतीच्या उलट, आधुनिक इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सूटमुळे बाजारातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत भर पडली आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणी प्रचालित व्यापक-स्तरावरील सहभागाद्वारे योग्य किंमत शोध शक्य झाला आहे आणि त्यामुळे हातचलाखी केली जाण्याची जोखीम नष्ट झाली.

कमोडिटी ट्रेडिंगचे तोटे

अनेक फायदे असले तरी, कमोडिटी ट्रेडिंगमध्ये काही तोटे आहेत, जे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

लाभ: विशेषत: जर तुम्ही मार्जिन ट्रेडिंगमध्ये अननुभवी असाल तर, ही दुधारी तलवार होऊ शकते.

यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे, लाभ हा,व्यापाऱ्यांना बाजारात मोठी बोली लावण्याची मुभा मिळवून देतो. जर मार्जिन 5 टक्के असेल, तर केवळ ₹5000 भरून ₹100,000 किंमतीचे कमोडिटी फ्यूचर्स खरेदी करता येतात. याचा अर्थ असा की, किंमतीत किंचित घसरण झाल्याची परिणती, व्यापारी लक्षणीय रक्कम गमावण्यामध्ये होऊ शकते.

उच्च अस्थिरता: कमोडिटी ट्रेडिंगमधून जास्त परतावा हा ,कमोडिटीच्या उच्च किंमतीच्या अस्थिरतेमुळे मिळतो. जेव्हा वस्तूंची मागणी आणि पुरवठा अलवचिक असेल तेव्हा, किंमत ही, मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरली जाते. याचा अर्थ असा की , किंमतीत बदल होत असला तरी, पुरवठा आणि मागणी बदलत नसते, ज्यामुळे कमोडिटी फ्यूचर्सचे मूल्य लक्षणीयरीत्या बदलू शकते

विविधतेसाठी आदर्शवत नाही: सिक्युरिटी आणि कमोडिटी यांदरम्यान नकारात्मक सहसंबंध असूनही, कमोडिटी ही पोर्टफोलिओ विविधतेसाठी योग्य नाही. 2008 च्या आर्थिक संकटादरम्यान, कमोडिटी किंमत ही स्टॉकच्या विपरीत दिशेने जाते हा सिद्धांत अनुभव म्हणून कामी आला नाही. वाढती महागाई, बेरोजगारी आणि कमी झालेली मागणी यांमुळे कंपन्यांचे उत्पादन रोखले जाते आणि कमोडिटी मार्केटमधील कच्च्या मालाच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे हे असले तरी, कमोडिटी गुंतवणूक साधने ही अनेकदा एका किंवा दोन उद्योगांवर लक्ष केंद्रित करतात, याचा अर्थ एकाच घटकातील मत्तेचे उच्चतम ध्रुवीकरण हा आहे.

कमी परतावा परंतु अधिक अस्थिरता: कमोडिटी ट्रेडिंगला लक्षणीय परतावा मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. ब्लूमबर्ग कमोडिटी इंडेक्स, ज्याला गोल्ड स्टँडर्ड मानले जाते, त्यामध्ये दर्शविलेले आहे की ,सर्वात सुरक्षित सरकारी बाँड्सनाही कमोडिटी ट्रेडिंगपेक्षा ऐतिहासिकरीत्या अधिक परतावे मिळाले आहेत. हे मुख्यत्वे उत्पादनांच्या चक्रीय स्वरुपामुळे आहे, जे खरेदी -नि-धारण करुन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचे मूल्य कमी करते. सुरक्षित कोषागार देयकेदेखील कमोडिटी मार्केटच्या तुलनेत कमी अस्थिरतेवर जास्त परतावा निर्माण करतात.

मत्तांचे ध्रुवीकरण: कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे हे असले तरी, कमोडिटी गुंतवणूक साधने ही अनेकदा एका किंवा दोन उद्योगांवर लक्ष केंद्रित करतात, याचा अर्थ एकाच घटकातील मत्तेचे उच्चतम ध्रुवीकरण हा आहे.

कमोडिटी ट्रेडिंग संबंधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कमोडिटीची रोख किंमत किती आहे?

कमोडिटी किंमत म्हणजे, वास्तविक जगात खरेदी आणि विक्री केल्यावर प्रत्यक्ष वस्तूंची किंमत होय. यामध्ये उत्पादनाच्या वाहतुकीसाठी आणि साठवणासाठी केलेल्या खर्चांसारखे इतर खर्च समाविष्ट असू शकतात.

कमोडिटी म्हणजे काय?

कमोडिटी ट्रेडिंगच्या संदर्भात, कमोडिटी ही, प्राथमिक उत्पादने किंवा कच्चा माल जसे की धातू, कृषीविषयक माल, पशुधन आणि ऊर्जा उत्पादने आहेत,जी कमोडिटी मार्केटमध्ये व्यापार करण्यासाठी उपलब्ध असतात.

कमोडिटी ट्रेडिंग कसे नियमित केले जाते?

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड हे कमोडिटी मार्केटचे नियमन करते. देशात सहा कमोडिटी एक्सचेंज आहेत जेथे व्यापारी विस्तृत श्रेणीतील उत्पादनांमध्ये व्यापार करतात. कमोडिटी मार्केट अत्यंत विकसित आहे आणि सर्वात नियमित मार्केटपैकी एक आहे.

कमोडिटी म्हणून कोणत्या वस्तूंचा विचार केला जातो?

कमोडिटी मार्केटमधील कमोडिटी तीन प्रमुख प्रवर्गांअंतर्गत उपलब्ध आहेत.

 • कृषीविषयक कमोडिटी
 • धातू कमोडिटी
 • ऊर्जा कमोडिटी

भारतातील कमोडिटी फॉरवर्ड/फ्यूचर्स ट्रेडिंगमधील वर्तमान नियमन प्रणाली काय आहे?

फॉरवर्ड मार्केट कमिशन (एफएमसी) हे कमोडिटी फ्यूचर्स मार्केटचे नियामक आहे. वर्तमान नियमन प्रणाली ही, वित्त मंत्रालय, फॉरवर्ड मार्केट कमिशन (एफएमसी) आणि एक्सचेंज यांचा समावेश असलेल्या त्रिस्तरीय दृष्टिकोनानुसार अनुसरण करते.

भारत सरकार भविष्यातील व्यापारासंबंधी धोरणे तयार करते. 1953 मध्ये अस्तित्वात आलेले एफएमसी, सरकारच्या धोरणांनुसार एक्सचेंजचे नियम व विनियम यांना मान्यता देते. आणि तिसरे, बॉर्स हे, ट्रेडिंगसाठी मंच आणि चौकट पुरवतात. फॉरवर्ड मार्केट कमिशन हे,फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट(नियमन) अधिनियम, १९५२ ची अंमलबजावणी करून बाजारपेठेचे नियमन करते.