अल्ट्रा शॉर्ट-टर्म म्युच्युअल फंड म्हणजे काय?

1 min read
by Angel One

ज्या गुंतवणूकदारांना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे आणि त्यांच्या कॉर्पसला बदलत्या व्याजदराच्या जोखमीपासून संरक्षण करायचे आहे त्यांच्यासाठी अल्ट्रा-शॉर्ट-टर्म म्युच्युअल फंड हा एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो.

डेब्ट फंड हे इक्विटी मार्केटच्या अस्थिरतेपासून सुरक्षितपणे गुंतवणूक  करू इच्छिणाऱ्या आणि त्यांच्या फंडचे संरक्षण करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी  लोकप्रिय म्युच्युअल फंड आहेत. डेब्ट फंड प्रामुख्याने बाँड्स, ट्रेझरी बिल आणि डिपॉझिट सर्टिफिकेट सारख्या मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करतात. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (SEBI)  ने डेब्ट फंडला सोळा कॅटेगरीमध्ये विभाजित केले आहे.

अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंड ओव्हरनाईट किंवा लिक्विड फंड आणि इतर डेब्ट फंडमधून मिडवे ठेवले जातात. आपण  अल्ट्रा शॉर्ट-टर्म डेब्ट फंड, गुंतवणुकीचे फायदे आणि गुंतवणुक  प्रोफाईलविषयी सर्वकाही जाणून घेऊ.

अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंड म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, या योजनांमध्ये तीन ते सहा महिन्यांचा अल्प गुंतवणूक कालावधी आहे. हे फंड कमी कालावधीच्या डेब्ट साधनांमध्ये गुंतवणूक  करतात, त्यामुळे फंडचा मॅकॉले कालावधी बहुतेक सहा महिन्यांमध्ये आहे. हे लो-रिस्क फंड आहेत, तरीही अल्ट्रा-शॉर्ट-टर्म म्युच्युअल फंड रिस्क स्पेक्ट्रममध्ये लिक्विड फंडच्या पेक्षा अधिक आहेत. विशिष्ट आर्थिक लक्ष्यासाठी इन्व्हेस्ट करण्याची इच्छा असलेल्या आणि पुराणमतवादी गुंतवणूकदारांसाठी  हे फंड सर्वोत्तम आहेत.

हे फंड सरासरी 7-9 टक्के रिटर्न निर्माण करतात.

अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंडचे फायदे

अल्ट्रा-शॉर्ट-टर्म डेब्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे अनेक लाभ प्रदान करते.

  • अल्प कालावधीसाठी आहेत – काही आठवडे किंवा काही महिने  भांडवल ठेवू  इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे आदर्श.
  •  जर कोणीतरी तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली  तर व्याजदर बदलण्यापासून उद्भवणारे नुकसान लवकर शून्य असते.
  •  या फंडातून मिळणारा परतावा बँकेच्या समान गुंतवणूक कालावधीच्या मुदत ठेवीशी तुलना करता येतो.  

अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी ?

हे फंड अल्प कालावधीत उच्च लिक्विडिटी ऑफर करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. या फंडचा मॅकॉले कालावधी तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान असल्याने, हे अल्पकालीन गुंतवणुकीसाठी  सर्वोत्तम आहे. गुंतवणूकदार  त्यांचे पैसे अल्ट्रा-शॉर्ट-टर्म फंडमध्ये ठेवू शकतात जे बँकच्या बचत खात्यापेक्षा  जास्त रिटर्न देऊ करते.

तथापि, तुम्हाला तुमच्या एकूण आर्थिक  आणि गुंतवणूक योजनेला अनुरूप फंड आढळला पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी व्यक्ती सर्वोत्तम अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंडसाठी मार्केटचे  संशोधन करू शकतात.

गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घेण्याचे घटक

अल्ट्रा-शॉर्ट डेब्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना इन्व्हेस्टरनी विचारात घेणे आवश्यक आहे.

रिस्क आणि रिटर्न:

अल्ट्रा-शॉर्ट फंडमध्ये सर्व डेब्ट फंडसाठी तीन सामान्य रिस्क असतात.

  • क्रेडिट रिस्क:

हे अंतर्निहित कर्जाच्या जारीकर्त्याद्वारे डिफॉल्टच्या जोखीम संदर्भित करते.

  • व्याजदर रिस्क:

हे एक रिस्क आहे जे व्याजदर मधील बदलाशी संबंधित आहे.

  • लिक्विडिटी रिस्क:

गुंतवणूकदारां कडून रिडेम्पशन विनंती पूर्ण करण्यासाठी फंड हाऊसकडे पुरेसा फंड नाही.

खर्चाचे प्रमाण 

या फंडमधून रिटर्न इक्विटी फंडपेक्षा कमी असल्याने, गुंतवणूकदारांनी त्यांचे लाभ जास्तीत जास्त वाढविण्यासाठी शक्य तितके खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. खर्चाचे प्रमाण हे  फंड व्यवस्थापन कंपनीद्वारे निधी व्यवस्थापन सेवा ऑफर करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क आहे.

गुंतवणूक योजना

योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे , आर्थिक उद्दिष्टे आणि रिस्क क्षमता स्पष्टपणे निश्चित करणे आवश्यक आहे. कमी-रिस्क रिटर्न निर्माण करण्यासाठी आणि त्वरित लिक्विडिटी ऑफर करण्यासाठी पुराणमतवादी गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे फंड तयार केले जातात.

क्रेडिट जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूकदारांला सर्वोत्तम अल्ट्रा-शॉर्ट डेब्ट फंड शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्यांनी क्रेडिट जोखीम कमी करण्यासाठी उच्च-रेटेड सिक्युरिटीजसह फंड निवडणे आवश्यक आहे. विविध व्याजदर चक्रांद्वारे निधीची सुसंगतता आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. अनुभवी फंड मॅनेजर बदलत्या व्याजदराच्या व्यवस्थेत  फंड योग्यरित्या कामगिरी करेल याची खात्री करेल.

आर्थिक ध्येय 

अल्पकालीन आर्थिक ध्येय असलेले किंवा सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) (STP) आवश्यक असलेले गुंतवणूकदार  गुंतवणूक करू शकतात. या फंडचा लिक्विड फंडपेक्षा जास्त कालावधी आहे. म्हणून, ते गुंतवणूकदारांना  त्यांच्या अल्पकालीन आर्थिक  लक्ष्यांसाठी प्लॅन करण्याची परवानगी देतात. तसेच, तुम्ही इक्विटी फंड सारख्या जोखीमदार पर्यायांमध्ये तुमचा फंड हलवण्यापूर्वी अल्ट्रा-शॉर्ट-टर्म फंडसह सिस्टीमॅटिक ट्रान्सफर प्लॅन सेट-अप करू शकता.

नियमित मासिक उत्पन्न हव्या असलेल्या व्यक्ती स्थिर रिटर्न निर्माण करण्यासाठी त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचा काही भाग ठेवू  शकतात.

अल्ट्रा-शॉर्ट-टर्म बाँड्सवर टॅक्सेशन

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक  करता, तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारा भांडवली नफा कॅपिटल गेन टॅक्सला आकर्षित करतो . कर दर तुमच्या गुंतवणुकीच्या  कालावधीवर अवलंबून असतो. तुमच्या गुंतवणुकीच्या  कालावधीवर आधारित – शॉर्ट-टर्म किंवा लाँग-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल.

या फंडमधून शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन गुंतवणूकदाराच्या  एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स दर इंडेक्सेशनसह 20% आणि इंडेक्सेशनशिवाय 10% आहे.

निष्कर्ष

अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंडविषयी जाणून घेतल्यानंतर, सर्वोत्तम अल्ट्रा शॉर्ट-टर्म फंड शोधण्याची वेळ आली आहे. जर एकट्याने आर्थिक निर्णय घेणे तुमच्यासाठी कठीण असल्यास, तुम्ही नेहमी आर्थिक सल्लागारांकडे जाऊ शकता,, जे तुम्हाला तुमच्या अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक  लक्ष्यांनुसार सर्वोत्तम गुंतवणूक  निवडण्यास मदत करेल.